रोजच तुझी वाट पाहतो मी
... पाहतो अन पाहतही नाही!
कधी कधी असंही होतं
तू येतेस
... येते तू!
... येतेस अन येताही नाही!
तुझे शब्द सुरवतात
ऐकू येतात मला
माझा जन्म चिंब करून सोडतात
भिजवतात मला
... भिजवतात अन भिजवतही नाही!
तुझी नजर नेहेमीच खुणावते मला
मी ती चोरून ऐकतो
समजतात मला त्या खाणाखुणा
... समजतात अन समजतही नाही!
रोजच तुझा विचार करतो मी
अहं!!!
तुझाच विचार असतो नेहेमी
- बोलावं म्हणतो तुझ्याशी
मोकळं करावं मन -
रोजच ठरवतो असं बरंच काही
... ठरवतो अन ठरवतही नाही!
रोजच
अगदी रोज एक फिनिक्स नवी भरारी घेतो
रोज जन्मतो अन रोज राख होतो
... मरतो अन मरतही नाही!
... ... मी पुन्हा तुझी वाट पाहतोय!
- आशिष भोजने
Comments